जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने कापूर रोपांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे,वनौषधी मित्र किसन दामधर,आर्ट अँड हॉबीज फाउंडेशनच्या चेअरमन सारिका बिरारी,पर्यावरण मित्र गुरुदत्त कांबळे,तथास्तू ज्वेलर्सचे संजय बिरारी,सुरेश वसुले,आर्या पाटील,दृष्टी पाटील, मनस्वी घरत,डॉ.रुद्रा बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते कापूर रोपे नागरिकांना भेट देण्यात आली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींनी कौतूक केले. पर्यावरणदिनाची सुरुवात प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरापासून करावी,जागतिक पर्यावरणदिन हा दररोज साजरा करावा असे आवाहन यावेळी वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी केले.
गतवर्षी जागतिक पर्यावरणदिनी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी नागरिकांच्या घरी जाऊन सफेद मूसळी, अश्वगंधा,दमवेल,अर्जुन, पर्णबीज,केवडा,चित्रक,सीतेचा अशोक,बेल आदी शेकडो रोपे नागरिकांना भेट दिली होती.