खोपोली
खोपोली शहर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून 21 सप्टेबर रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, खोपोली येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले यावेळी रक्तदात्यानी उत्स्फूर्तणे रक्तदान केले तर अनेक नागरिकांनी तपासणी करून घेतली. समर्पण ब्लड बॅंक मुंबई व खोपोली शाखेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले.खोपोली शहर भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकाराने शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर तर समितीतील डॉ. नागरगोजे, संजय म्हात्रे यांचे देखरेखीखाली हे दोन्ही कार्यक्रम पार पडले.भाजपच्या वतीने सेवा पंधरावङयात सेवाभावी व लोकपयोगी कार्यक्रम हाती घेत शहरातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पोहचला जावा या हेतूने पक्ष
कार्यकर्ता झटत असल्याचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी बोलताना सांगितले. पार पडलेल्या शिबिरा प्रसंगी उत्तर रायगड जिल्हा महिलाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील,शहर सरचिटणीस हेमंत नांदे, कोकण विभागीय जैन प्रकोष्ट उपाध्यक्ष किर्ती ओसवाल,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, प्रमोद पिंगळे,दिलिप पवार,सूर्यकांत देशमुख, सुधाकर दळवी, शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा काटे ,अश्विनी अत्रे, रसिका शेटे,स्नेहल सावंत,सुनिता महर्षी,विकास नाईक,गोपाळ बावसकर,संजय कचरे,अपर्णा साठे, राहूल जाधव, रमेश रेटरेकर,सुनिल नांदे, सूनिता पाटणकर सचिन मोरे, विनायक माडपे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्य तपासणी डॉ. नागरगोजे,डॉ.चंदनशिवे, डॉ.संजय पाटील यांनी करून मार्गदर्शन केले.