माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी; मुख्यमंत्र्यांना पत्र
कर्जत। कर्जत शहराचे दोन्ही भाग जोडणाऱ्या उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात आहे. मात्र दीड वर्षांचा कालावधी लोटला तरी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. दरम्यान, या पुलाचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्रयी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुलाच्या रखडलेल्या कामासाठी निपी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कर्जत शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीवर १९६० मध्ये मुरबाड रस्त्याची निर्मिती झाली, त्यावेळी पूल बांधण्यात आला होता. आमराई परिसरात बांधण्यात आलेल्या पुलाला ‘श्रीराम पूल’ असे नामकरण करण्यात आले आहे. या पुलावरून एकावेळी दोन्ही बाजूला जाणाऱ्या गाड्यांची संख्या एक अशी असल्याने या पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. त्याचा परिणाम या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस उभे करण्याची वेळ पोलीस प्रशासनाला आली असून कायम त्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाहनांच्या गर्दीमुळे होत असते.
नेहमी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी २०२३ मध्ये श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण आठ कोटी रुपये या पुलाच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहे. दीड वर्षांपासून या पुलाच्या कामास सुरुवात झालीअसून या पुलाच्या निर्मितीमुळे श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र गेल्या पाच महिन्यात नवीन पुलाचे काम पूर्णपणे बंद आहे.
या नवीन पुलाचे सहा खांब नदीमध्ये उभे राहिले असून अन्य भागातील पुलाचे काम अद्याप बाकी आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर जे बांधकाम बंद झाले ते आजपर्यंत बंदच आहे. दुसरीकडे पुलाचे काम बंद असल्याने आणि पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी काम सुरु होत नसल्याने माजीआमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एवढ्या मंदगतीने पुलाचे काम कसे करू शकते असा प्रश्न सुरेश लाड यांनी केला आहे.
कर्जत शहराची वाहतूक कोंडीतून सटका करण्यासाठी नवीन पुलाची निर्माती होणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने पुलाच्या कामातील त्रुटी दूर करून तात्काळ कामाला सुरुवात करावी अशी सूचना माजी आमदार लाड यांनी केली आहे.
श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम आमदार महेंद्र धोखे यांनी मंजूर केल्यावर येथील वाहतूक कोंडी कायमची दूर होईल, असे वाटले होते. मात्र पुलाचे काम रखडले आहे. बांधकाम खात्याला काही अडचणी असतील तर त्यांनी दूर कराव्यात. त्यात शासनाकडून निधी वर्ग होण्यात अडचणी असतील तर आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत आहोत. या पुलाचे काम तात्काळ सुरु व्हावे आणि नवीन वर्षात पावसाळ्याआधी नवीन पुलावरून वाहतूक सुरु व्हावी, असे प्रयत्न बांधकाम खात्याने करावेत.
– सुरेश लाड, माजी आमदार, कर्जत