खोपोली । खालापूर तालुका शिक्षणप्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय, खोपोली येथील २९ डिसेंबर रोजी पटांगणात पत्रकार तय्यब खान आणि आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केटीएसपी (एचएससी) मंडळ शिक्षकांनी विजेतेपद पटकावले. तर खोपोली पत्रकार संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे यशवंत साबळे, पत्रकार मेहबूब जमादार, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्षफिरोज पिंजारी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खलील सुर्वे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन कोकण प्रदेश अध्यक्ष सुधीर माने, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, प्रविण कोळआपटे, व्हॉईस ऑफ मीडिया खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप, पत्रकार राम बोरीले यांच्यासह खोपोली-खालापूरमधील सर्व पत्रकार मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आयोजक पत्रकार तय्यब खान व आकाश जाधव यांना शुभेच्छा देत त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.