विरांगणा फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा खेडकर यांचा पुढाकार…

आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्तिथीनिमित्त खोपोली शिळफाटा येथे विरंगणा फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयात सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांच्या हस्ते मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्या प्रसंगी विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते
दिवश राठोड, शिवसेना उपशहर प्रमुख प्रसाद वाडकर,मोईन शेख,शिवसेना उपशहर संघटक मोहन केदार, डॉ. बी के नागरगोजे ,विकास नाईक-खुरपूडे,संदीप वाघमारे शाबिर पटेल,उत्तम पूनमिया,अजू मोरे, श्रीकांत खेडकर तसेच इतर मान्यवर यांनी गोपीनाथ मुंडे यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली..
वीरांगना फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी मुंडे साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुंडे हे केवळ मनातच नाही तर देव्हाऱ्यात पुजले जातात, असे मनामनात स्थान लाभलेले नेते आहेत हे विषद केले.