- अलिबाग तालुक्यातील कुरुळ आदिवासी वाडी येथील तीन वर्षीय मुलाचा अपहरण करणारा आरोपी मधुकर नारायण पारधी (वय 22 रा भोमोली, पोयनाडतालुका-अलिबाग)यास अलिबाग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ आदिवासी वाडी येथून रविवारी दिनांक 24 जुलै2022 रोजी रात्री तीन वर्षीय बालकाचे अपहरण केले होते. आलेल्या तक्रारीची दखल अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी घेत तातडीने शोध पथक तयार करुन शोध घेण्यास सुरवात केली. अपहरण झालेल्या मुलाचा अलिबाग पोलिसांनी शितफिने शोध घेत अवघ्या काही तासातच आपल्या मातेच्या स्वाधीन केले.
आरोपी मधुकर नारायण पारधी या अपहरणकर्त्याने रविवारी कुरुळ आदिवासी वाडी येथून भावासोबत घराबाहेर खेळत असलेल्या संदेश नाईक याला खाऊ देतो सागून नेला सदर मुलाचे अपहरण केले.
याबाबतची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहायक उपनिरीक्षक प्रतीक पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील फड, पोलिस शिपाई शशिकांत सुतार, अतुल महीद आदींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. खंडाळे तसेच भोमोली येथे त्याचा शोध घेतलं त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पेण असाने, दिवाणमाळ येथून मधुकर पारधी याला ताब्यात घेवून बालकाची सुटका करीत मातेच्या स्वाधीन केले.
आरोपी मधुकर नारायण पारधी यास आज अलिबाग पोलिसांनी अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.