“तळागालातील गरीब-गरजू होतकरू मुलगा शाळेमध्ये गेला पाहिजे व तो शाळेत टिकला पाहिजे ” या मुख्य उद्देशाने “लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट” ही गेली १६ वर्षे अलिबाग मध्ये कार्यरत आहे.या लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट” च्या वतीने बोर्ली येथे महाचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि.१८ जुलै २०२२ आणि २३ जुलै २०२२ रोजी “लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट” या सामाजिक संस्थे-अंतर्गत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके,रामराज, बेलोशी ह्या चार केंद्राच्या सर्व दहावी च्या विद्यार्थी आणि पालकांसोबत महाचर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला.
लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट जसे विद्यार्थ्यांसोबत अनेक उपक्रम घेत असते तसेच पालकांसोबत सुद्धा विविध उपक्रम घेते. इयत्ता दहावीच्या वर्षाचे गांभीर्य सर्व दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
“तळागालातील गरीब-गरजू होतकरू मुलगा शाळेमध्ये गेला पाहिजे व तो शाळेत टिकला पाहिजे ” या मुख्य उद्देशाने “लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट” ही गेली १६ वर्षे अलिबाग मध्ये कार्यरत आहे.या वर्षासाठी संस्थेने बोर्ली,वळके,रामराज व बेलोशी अशा चार विभागातून २९६ मुलांची निवड केली असून २९६ विद्यार्थी आणि २९६ पालकांसोबत संस्था काम करत आहे. २९६ मधून ९७ विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये आहेत. महाचर्चा हा कार्यक्रम ८० विद्यार्थी आणि ५९ पालकांसोबत घेण्यात आला.
महाचर्चा कार्यक्रमामध्ये एस. एस. सी. परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आली . सराव आणि पाठांतराला किती वेळ दिला पाहिजे तसेच अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यासाला कितपत महत्व दिले पाहिजे यावर बोलणे केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक कश्याप्रकारे बनवून त्याचे पालन केले पाहिजे. पाल्याने स्वतःची आणि पालकांनी पाल्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे समजून सांगितले. मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि पालकांचा उत्कृष्ट सहभागाने कार्यक्रम पार पडला.
महाचर्चा कार्यक्रमामध्ये बोर्ली गावाचे प्रथम नागरिक सरपंच चेतन जावसेन , वळके हायस्कूल चे मुख्याध्यापक रविंद्र नाईक , बेलोशी हायस्कूल चे मुख्याध्यापक भोईर ,वळके हायस्कूल चे शिक्षक मोरे “लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट” चे प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील , वळके केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते आशिष कचरेकर, रामराज केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद नाईक, बोर्ली केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या रश्मी अष्टमकर, बेलोशी केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुजा राऊळ, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.