जन्म. १५ नोव्हेंबर १९२६ पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतामधील जैकोबाबाद येथे.
अर्जुन हिंगोराणी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुंबईत आले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असले, तरी चित्रपटांच्या आवडीमुळे ते या क्षेत्रात आले. १९६० ते १९९० या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या १९६० साली बनविलेल्या चित्रपटात भूमिका देऊन अभिनेता धर्मेंद्र यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले केले. त्यानंतरही दोघांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले.अर्जुन हिंगोरानी व धर्मेंद्र एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना घेऊन कब, क्यूँ और कहाँ (१९७०), कहानी किस्मत की (१९७३), सल्तनत (१९८३), कौन करे कुर्बानी या चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मितीही केली. ‘अब्बास’ हा सिंधी भाषेतील पहिला चित्रपट बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. नंतर त्यांनी अनेक सिंधी भाषेतील चित्रपट बनवले यात ‘जिनतें अब्बाना’ यासारख्यान चित्रपटाचा समावेश आहे. अर्जुन हिंगोरानी यांच्या’ चित्रपटाच्याल टायटलचे वैशिष्य्बनव म्हाणजे त्यांसच्याे चित्रपटांच्यार टायटलमध्येा तीन ‘क’ला असत. तीन ‘क’ असणे ते शुभ मानत होते. त्यायवेळी ‘सल्तनत’च्या टायटलमध्येा तीन ‘क’ जोडण्याटसाठी चित्रपटाची टॅगलाईन ‘कारनामे कमाल के’ अशी करण्यात आली होती, असे म्हंटले जाते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांमध्ये “कब क्यों और कहॉं’, “कहानी किस्मत की’, “कातिलों के कातिल’, “कुदरत का करिश्माा’, “खेल खिलाडी का’, “सल्तनत’ आदींचा समावेश आहे. अर्जुन हिंगोराणी यांनी “हाऊ टू बी हॅप्पी अँड रियलाइज युवर ड्रीम्स’ नावाचे पुस्तकही लिहिले होते. अर्जुन हिंगोरानी यांचे ५ मे २०१८ रोजी निधन झाले.