रसायनी 

रसायनीतील डॉक्टरांनी एकत्रित येऊन प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे.या डॉक्टर असोसिएशनकडून ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्यविषयक शिबिर, विविध आजारांवर मार्गदर्शन,मोफत औषधोपचार आदी कार्य केले जाते.मागील वर्षी महाड पुरग्रस्त भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे महत्वाचे काम या रसायनीतील प्रायमा असोसिएशनने केले आहे.यावर्षी आषाढी एकादशी निमित्त प्रायमा असोसिएशनच्या डाॅक्टरांनी वारक-यांसाठी मोफत तपासणी करून मार्गदर्शन केले.

 

यावेळी प्रायमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुरंगळे, माजी अध्यक्ष डॉक्टर रोहित कदम- पाटील यांच्या प्रयत्नाने भारत सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे आलेल्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देण्याचे काम हे करण्यात आले.सेवा करत असताना सर्व डॉक्टर वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून स्वता:ला भाग्यवान समजत होते. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा ही प्रायमा डॉक्टर असोसिएशनकडून देण्यात आली. यावेळेस डॉ. संजय कुरंगळे, डॉ. धीरज जैन, डॉ. रोहित कदम-पाटील, डॉ. राहुल यादव, डॉ. प्रशांत जगताप, या वेळेस हजारो वारकऱ्यांनी डॉ. बिलास कुलकर्णी, डॉ. युवराज या सेवेचा लाभ घेतला तसेच ही म्हशेलकर हे उपस्थित होते.वारक-यांना रसायनीतील प्रायमा असोसिएशनकडून डॉक्टर सेवा मोफत मिळाल्याने त्यांनी असोसिएशनच्या डाॅक्टरांचे कौतुक केले.