विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तीन आमदार सहित इतर सेनेचे आमदार कुठे गेलेत याची कुणालाही काही माहिती नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. नगरविकास मंत्री आणि रायगडचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी,महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले ह्यांचे फोन नॉट रीचेबल लागत आहे.त्यामुळे ते कुठे गेले आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.
याबाबत रायगडचे आमदर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ह्या सर्वांचा भ्रमणध्वनी बंद आहे.मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या भ्रमणध्वनी वर गुजराती भाषेची रिंग टोन ऐकू येत आहे.
विधानपरिषद निवडणूक ही सोमवार दिनांक 20 जुलै2022 रोजी झाली असून यामध्ये राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे.यामुळे महाविकास आघाडी मध्ये असणारे वाद आता चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे शिवसेनेचे नंबर दोनचे नेते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही कारणावरून नाराज असल्याने ते आणि त्यांचे समर्थक असणारे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,सहित आमदार महेंद्र दळवी,भरत गोगावले,महेंद्र थोरवे यांच्यासाहित पंचवीस आमदर हे विधानपरिषद निवडणुकीत मतदान केल्यानंतर कुठे गेले याची माहीती कोणालाही नाही.या बंडखोर गटाचे नेतृत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करीत आहे.यापूर्वी सर्वप्रथम माजी गृहमंत्री छगन भुजबळ त्यांनतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत समर्थकासह केला हॊता. आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाची झळ शिवसेनेला सोसावी लागेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेच्या मंत्र्यासाहित सर्व आमदारांची बैठक बोलावली होती.मात्र या बैठकीत हे तेरा जण गैरहजर असल्याने शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे.
विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेने आपले दोन उमेदवार यांना विजयी करण्याचे यशस्वी झाले. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मात्र पराभूत झाले आहे.
आता फुटलेल्या मतावरून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.