अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, पत्रकार, ॲड. जनार्दन पाटील यांचे पुणे येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली,बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर गेली दोन वर्षे कर्करोगावर उपचार सुरू होते
जनार्दन पाटील यांनी कृषीवल मध्ये असताना उंदेरी किल्ला विकला गेल्याची जनार्दन पाटीलने दिलेली बातमी तेव्हा नॅशनल न्यूज ठरली.. जनार्दन स्टार पत्रकार झाला.. टाइम्स ऑफ इंडिया ने जनार्दन ची मुलाखत घेतली होती.. जनार्दनमुळे किल्ला वाचला होता.. त्यानंतर अशा घटना घडत गेल्या की,त्यानंतर जनार्दन पाटील यांना महिनाभर पोलीस संरक्षण होते. पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि कमालीचा न्युज सेन्स यामुळे त्याने अनेक चांगल्या बातम्या दिल्या.त्यांनी अनेक समस्या ना वाचा फोडत सर्वसामान्याना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. जनार्दन हाडाचा पत्रकार होता..एक चांगला पत्रकार आज आपण गमविला आहे..जनार्दन कायम स्मरणात राहिल.यावेळी त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने चाहते आले होते..