जन्म.२३ जून १९२१ लाहोर येथे.
रहमान यांचे सैद रहमान खान हे पुर्ण नाव. रहमान यांना लहानपणा पासून अभिनयाची आवड होती. रहमान यांचा जन्म जरी लाहोर येथे झाला असला तरी त्यांचे कुटुंबीय जबलपुरला नोकरी निमीत्त आले त्यामुळे रहमान यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जबलपुर येथे झाले. रहमान यांनी १९४२ साली आपले कॉलेज शिक्षण संपवून रॉयल इंडियन वायुसेनेत सामिल होण्यासाठी पुण्यात पायलट चे प्रशिक्षण घेतले, व वायुसेनेत पायलट म्हणून नोकरीस सुरुवात केली. अभिनयाची संधी आल्याने त्यांनी वायुसेनेची नोकरी सोडली व पुर्ण पणे अभिनय क्षेत्र स्विकारले. रहमान यांनी १९४० पासून १९७० पर्यत आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टी गाजवली. पुण्यात प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी मराठी लेखक-निर्देशक विष्णम बेडेकर यांचे सहायक म्हणून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. तेथेच त्यांची गुरुदत्त व देवानंद यांची मैत्री झाली. व पुढे रहमान हे गुरु दत्त टीमचे एक अभिन्न हिस्सा बनले. नायक म्हणून काही चित्रपटात काम केले पण त्यांनी चरित्र अभिनेत्यांची कामे खूप केली. प्यासा मधील त्यांच्यावर चित्रीत गाणे- “एक दिल के तुकडे हज़ार हू, कोई याहा गिरा, कोई वाहा गीरा” हे खूप गाजले होते. साहिब बीबी और गुलाम या चित्रपटात ट्रेजडी क्वीन मीना कुमारी बरोबर रहमान यांनी धुंद व मस्त जमीनदार छोटे बाबूची भूमीका गाजवली होती. रहमान यांनी गुलजार यांच्या आंधी चित्रपटात सुचित्रा सेन यांच्या वडिलांची भूमिका केली होती. रहमान यांचे ५ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
रहमान यांचे गाजलेले चित्रपट, प्यार की जीत, बडी बहन, प्यासा, साहिब बीबी और गुलाम, दिल ने फिर याद किया, सावंरिया, वक्त,आंधी.