महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे व माजी सरपंच संदिप मुंढे या दोघा उभयतांच्या प्रयत्नातून रसायनी परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारी या जोडीची परिसरात नेहमीच चर्चा असते.जिल्हा परिषद निधीतून उमाताई मुंढे व संदीप मुंढे यांच्या प्रयत्नाने वासांबे मोहोपाडा हद्दीतील सात आदीवासी वाड्यांना साहित्य वाटप व दिव्यांगांच्या बचत गटांना शंभर खुर्चांचे वाटप तसेच दिव्यांग शैलेश कांबळे यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी दिलीप बाळाराम वाघमारे व कृष्णा दत्ता वाघमारे या दोघांना मच्छी पकडण्यासाठी जाळी संच,वजनकाटा व छत्री वाटप करण्यात आली.तसेच मोहोपाडा आदीवासीवाडी यांना बॅंजो साहित्य,शिंदीआदीवासीवाडी व खोंडा आदीवासीवाडी यांना प्रत्येकी चौदा खुर्चा वाटप करण्यात आल्या.शिवनगर आदीवासी वाडीला मंडप साहित्य यात राजा राणी सोफा सेट,शंभर खुर्चां,स्पिकर,लाईंट कपडा आदी साहित्य तर पानशिल आदीवासीवाडीला सतरंजी पाच नग व चौदा खुर्चां वाटप करण्यात आल्या.खोंडावाडी आदीवासीवाडीतील बांधवांना भांड्यांचा संच वाटप करण्यात आला.

तर रिस आदीवासीवाडीला जेवणासाठी दहा टेबल व चौवीस खुर्चां तसेच तळेगाव आदीवासीवाडीला पाच सतरंजी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे व माजी सरपंच संदिप मुंढे तसेच माजी सरपंच भाग्यश्री पवार, माजी प्रभारी सरपंच दत्ता शिंदे, कैलास म्हात्रे, विभाग अध्यक्ष अनिल पिंगळे, माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, रोटरी अध्यक्ष गणेश काळे,ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, जयराम पाटील, नंदकुमार पाटील, बाळाराम जांभळे, पांडुरंग पारंगे,मा सदस्य नामदेव कोकंबे, मुकूंद जांभळे,विनायक डवले, देविदास म्हात्रे,संजय सांगळे,नयन म्हात्रे,नंदू कुरंगळे, समीर म्हात्रे,विभाग अध्यक्षा वर्षा पाटील,विनयाताई मुंढे, वासांबे पंचायत समिती विभाग अध्यक्षा रेश्मा चौधरी, राजश्री जांभळे,आदींचाहस्ते वाटप करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष चौधरी तर आभारप्रदर्शन अनिल पिंगळे यांनी पाहिले.