पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेही कक्षाचे अनावरण व हस्तांतरण करतांना पोलीस उपअधिक्षक संजय शुक्ला व अन्य मान्यवर दुसऱ्या छायाचित्रात मार्गदर्शन करतांना उपअधिक्षक संजय शुक्ला (छाया : अनिल पाटील)
खोपोली : केंद्र व राज्य बालहक्क कायदे व बाल लैगिक अत्याचार तपास नियम अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेही कक्षाची निर्मितीसाठी या क्षेत्रात कार्यरत कैलास सत्यार्थी चाईल्ड फाऊंडेशन ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून व रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे अनावरण उपविभागीय पोलीस अधिक्षक संजय शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, कैलास सत्यार्थी चाईल्ड फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती हेमंती मॅडम, खोपोली समन्वयक दीप्ती रामराजे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे, समर्थ प्रतिष्ठानचे सदस्य जयदीप कुंभार, कमलेश कोरपे खोपोली पोलीस स्टेशनमधील अन्य पोलीस अधिकारी, शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बोलतांना होते. यावेळी मान्यवरांनी बोलतांना लहान मुलांवरील लैगिंक किंवा अन्य कोणतेही अन्याय होऊ नयेत यासाठी
जनजागृती होण्यासाठी ही विविध माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.