जन्म.१ जून १९९२ सांगली येथे.
आजच्या काळात कुठल्याही स्पर्धेच्या धकाधकीत भाग न घेता काही कलाकार समाधानाने आपली आवड जोपासत आहेत. स्वतःचं असं एक व्यासपीठ तयार करून त्यात कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातलाच एक मनस्वी गायक अभिषेक पटवर्धन!
अभिषेक मूळचा सांगलीचा आहे. व्यवसायानं अभियंता असलेला अभिषेकने
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. सध्या तो नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाला आहे. त्याचं संगीताचं शिक्षण आई रचना पटवर्धन यांच्याकडे सुरू आहे. सांगलीत असताना त्याला रत्नाकर दिवाकर, अरविंदबुवा पटवर्धन यांसारख्या दिग्गजांकडूनही मार्गदर्शन मिळालं आहे. भारत सरकारतर्फे उपशास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती, पं. राम मराठे नाट्यसंगीत शिष्यवृत्ती त्याला मिळाली आहे. ‘ध्यास’ या मराठी चित्रपटासाठी त्यानं पार्श्वगायन केलं आहे. “आज राऊळात सारा” हे त्याचं गाणं यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालं आहे. ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ मध्ये ‘उस्मान’ आणि जाणता राजामध्ये ‘शाहीर’ ही भूमिका त्यांनी साकारली आहे. अभिषेक सांगली आकाशवाणीचा मान्यताप्राप्त कलाकार आहे आणि ‘झी सारेगमप’च्या सातव्या पर्वात सर्वोत्तम १६ स्पर्धकांतही तो होता. आजच्या संगीताच्या वातावरणाबद्दल तो म्हणतो, “पूर्वी शुद्ध सुरांचा मेळ असायचा, तसा आजच्या संगीतात फार कमी दिसतो.