विकास नाईक दैनिक नवराष्ट्र आयोजीत आदर्श केमिस्ट म्हणून सन्मानित ..

0
49

खोपोली…
         खोपोली येथील 1994 पासून श्री. गजानन मेडिकल स्टोअर्स च्या माध्यमातून वैद्यकीय अविरत सेवेत असलेले विकास नाईक हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात विविध सामाजिक संघटना व संस्थेमध्ये त्यांचा उत्साही सहभाग असतो. तसेच खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन दैनिक नवराष्ट्र यांनी दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी आदर्श केमिस्ट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले सदर सोहळा कँपोलियन क्लब खोपोली येथे पार पडला यावेळी कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र थोरवे, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विकास नाईक यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल खोपोली व खालापूर तालुक्यातून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत