कर्जत । माथेरान पालिका हद्दीतील चार शाळांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सरस्वती विद्यामंदिर माथेरान शाळेचे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आयोजित वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर, प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, तसेच सेंट झेवियर इंग्लिश हायस्कूल आणि सरस्वति विद्या मंदीर या शाळांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कला गुणदर्शन आयोजित करण्यात आले. माजी विद्यार्थी आणि माथेरानकर यांचे स्नेहसंमेलन म्हणजेच आपल्या अंगी असणारे अनेक कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उभारून दिले होते. सुरुवातीला माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नगरपरिषद अधिकारी यांचे उपस्थित होते. प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना प्रदर्शित करता नृत्य गायन कला व बोधात्मक संदेश देणारे कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रम सादरीकरणमध्ये माजी विद्यार्थी तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक कल्पना पाटील यांचा सहभाग मोलाचा ठरला.