जन्म.२० फेब्रुवारी १९२० सियालकोट.
श्याम यांचे सुंदर श्याम चड्ढा हे पूर्ण नाव होते. श्याम यांचा जन्म जरी सियालकोट येथे झाला व त्यांचे शिक्षण रावळपिंडी येथील गोर्डन कॉलेज मध्ये झाले. आपल्या वडिलांच्या इच्छेविरूद्ध श्याम यांनी लाहोर मध्ये १९४२ साली आलेल्या ‘गवंडी’ या पंजाबी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वीणा, मनोरमा, एम इस्माईल आणि आशा पोसले हे त्यांचे सहकारी कलाकार होते. वीणा व मनोरमा या मुंबईत स्थाईक झाल्यातर फाळणीनंतर आशा पोसले व एम इस्माईल लाहोरला परत गेले. आशा पोसले प्रसिध्द लॉलीवूड अभिनेत्री बनल्या. ५० च्या दशकातील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते श्याम यांनी नर्गिस अभिनित ‘मीना बाजार’ आणि अशोक कुमार यांच्या सोबत ‘समाधी’ या चित्रपटात अभीनय केला होता. बऱ्याच जुन्या काळातील लोकांना याची खात्री आहे की जर ते हयात असते तर त्यांनी दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांना यांना टक्कर दिली असती. त्या वेळी श्याम हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणा अभिनेता म्हणून ओळखले जात असत. १९४९ मध्ये प्रदर्शित झालेला बाजार हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट होता. यामध्ये त्यांनी निगर सुलतानाबरोबर काम केले होते. शाम हे लेखक सआदत हसन मंटो यांचे जवळचे मित्र होते. फाळणीनंतरही त्यांची मैत्री मजबूत राहिली. शाम यांचे मनकी जीत, मजबूर,दिल्लगी,पतंगा,चांदनी रात, मीना बाजार व समाधी हे गाजलेले चित्रपट होत. श्याम यांचे ते कारकीर्दीच्या शिखरावर असताना निधन झाले होते. श्याम यांचे २५ एप्रिल १९५१ रोजी रोजी फिल्मीस्तानच्या सेटवर घोड्यावरून खाली पडल्यामुळे आणि डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले.