‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते.
संगीतकार हेमंतकुमार हे या चित्रपटाचे निर्माते होते. तर दिग्दर्शक असित सेन होते. असित सेन यांनी या आधी ‘ममता ‘ ( १९६६), ‘आखरी रात ‘ ( १९६८), ‘सफर ‘ ( १९७०) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र नर्स राधा ( वहिदा रहेमान), देवकुमार ( धर्मेंद्र) आणि अरुण ( राजेश खन्ना) या तीन व्यक्तिरेखांभोवती गुंफले आहे. या चित्रपटात नासिर हुसेन, इफ्तेखार, ललिता पवार, अन्वर हुसेन, हेमलता इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. जुन्या चित्रपटाच्या शौकिनाना या चित्रपटाने भारावून टाकले होते. राजेश खन्ना आणि वहिदा रहेमान यांच्या दर्जेदार अभिनयाचे खूपच कौतुक झाले. वो शाम कुछ अजिब थी ( किशोरकुमार), हमने देखी है उन आॅखो की महकती खुशबू ( लता मंगेशकर), तुम पुकारलो ( हेमंतकुमार) असे श्रवणीय गीत संगीत असलेल्या ‘खामोशी’ हा चित्रपट संपूर्णपणे स्त्री-व्यक्तिरेखाप्रधान होता. त्यात राजेश खन्ना होते खरा पण वहिदा रेहमान यांच्या देदिप्यमान अभिनय कारकिर्दीतला झळाळता हिरा म्हणजे ’खामोशी’चित्रपट. कदाचित त्यामुळेच राजेश खन्ना यांच्या सुरुवातीच्या अप्रतिम, सहज आणि संवेदनशील अभिनयाचा देखणा आविष्कार असणारा हा सिनेमा फ़ार कोणी ‘त्यांचा’ म्हणून मानत नसावेत. वहिदा रेहमान या नि:संशयपणे अप्रतिम आहेच, मात्र सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतो यातला राजेश खन्ना यांचा विलक्षण सहज वावर. नदीच्या पात्रातल्या संथ, वाहत्या धारेसारखा त्याचा यातला आवाज.