कर्जत । कर्जत शहर बचाव समितीच्या बेमुदत साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांनी भेट दिली आहे. यामध्ये डास फवारणी घंटागाडीबाबत वेळापत्रक लावण्यात येईल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासने समितीला देण्यात आली आहेत.
शहरातील वाहतुकीचा प्रश्नाबाबत अॅड. कैलास मोरे यांनी दोन दिवसांतयेथील अनधिकृत हातगाड्या बाजूला करून अधिकृत हातगाड्यांची यादी बोर्डवर लावण्यात यावी. शहरातील एकेरी वाहतूक कारवाई न झाल्यास हे उपोषण सुरूच राहील. याबाबत शुक्रवारी, २० डिसेबर रोजी नगरपरिषदप्रशासनाच्यावतीने शहर बचाव समितीला लेखी आश्वासन दिले. सायंकाळी नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरावर शहर बचाव समितीने चर्चा केली. त्यावेळी कर्जत शहरात किती बदल केला जातो? हेपाहून उपोषणाबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
याप्रसंगी अॅड. कैलास मोरे, मोहन ओसवाल, राजाभाऊ कोठारी, सुनील कदम, सुरेश खानविलकर, हरिश्चंद्र यादव, संजय परदेशी, मल्हारी माने, नितीन परमार, अनिल मोरे, सतीश मुसळे, स्विटी बार्शी, निशा गुप्ता, धर्मे द्र मोरे, डॉ. प्रशांत सदावर्ते, प्रशांत उगले, अॅड. गोपाळ शेळके, सोमनाथ पालकर, अतुल कडू, उमेश शेट्ये, लोकेश यादव, दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते.