खोपोलीचे पहिले लोकनिर्वाचित पै . बाबुशेठ मुल्ला यांच्या श्रध्दांजली सभेत श्रध्दांजली सभेत इंदरमल खंडेलवाल यांनी त्यांच्या जीवन कार्याचा गौरव केला.माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांनी त्यांच्या काळात झालेल्या विकास कामांचे स्मरण करून दिले.दाऊद शेठ यांची परंपरा चालविल्याचे उद्गार त्यांनी काढले.उल्हास देशमुख यांचेही भाषण झाले.शिरीष बिवरे यांनी अजातशत्रू असलेल्या बाबुशेठ यांचे यथोचित स्मारक त्वरित उभारण्याची गरज व्यक्त केली.सुनील भालेराव यांनी कुठे थांबायचं हे कळणारा मोठा माणूस अशा शब्दात त्यांचे वर्णन केले.मधुकर दळवी यांनी प्रभावशाली व सर्वसमावेशक नेता असा गौरव केला.प्रकाश महाडिक यांनी नगर परिषदेच्या रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्याच्या घटनेचे स्मरण करुन दिले. वडिलांची परंपरा कायम ठेवली असे सांगून त्यांनी अनेक कार्यांना उजाळा दिला.अतीक खोत यांनी मुस्लीम समाजात त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे कथन केले.रामदास शेंडे यांचे उपकार न विसरण्यासारखे आहेत असे उद्गार काढले.कौटुंबिक नात्यांचे व संबंधांचे स्मरण त्यांनी करून दिले.दाऊदशेठ व बाबूशेठ यांचे संयुक्त स्मारक उभारण्यासाठी जागा देण्याची घोषणा त्यांनी केली.मोहन औसरमल यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील आदर्शांचा उल्लेख केला.डॉ. शेखर जांभळे यांनी बाबुशेठ मुल्ला यांच्या सामाजिक सलोखा राखण्याच्या कार्याचा गौरव केला.डॉ. सुनील पाटील यांनी त्यांचे नेतृत्व,आदर्श व कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.स्मारक होवो ना होवो सर्वांच्या मनात बाबुशेठ कायम आहेत असे सांगून मुल्ला परिवाराच्या वतीने उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रचंड उपस्थिती लाभलेल्या या श्रद्धांजली सभेचे आयोजन रिचर्ड जॉन, सूर्यकांत देशमुख, डॉ.सुनील पाटील, कैलास गायकवाड, मनेश यादव, अविनाश तावडे, शाम कांबळे, सागर जाधव व प्रवीण क्षीरसागर यांनी उत्तम प्रकारे केले.