खोपोली, (वा.) कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार महेंद्र थोरवे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला करिष्मा दाखवून दिला. आमदार थोरवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना खोपोली शहरात महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर सत्कार करण्याच्या उद्देशाने बुधवारी खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत रॅलीला खोपोली शहरात सुरुवात करण्यात आली. या रॅलीला खोपोलीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीकरांचे आभार मानले. खोपोली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत या रॅलीची सांगता करण्यात कार्यकर्त्यांसह शिवसैनिक व युवासैनिकांनी डीजेच्या व ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरत आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाचा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले असून ठिकठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर फुलांची जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत त्यांचे खोपोलीत स्वागत करण्यात आले.

खोपोलीकरांची साथ कायम लक्षात राहील

रॅलीच्या सांगतेवेळी आ. थोरवे म्हणाले, खोपोलीकरांनी विकासकामांची पोचपावती मला दिल्याने सर्व खोपोलीकरांचे मनापासून मानावेत तितके आभार थोडेच आहेत. मी आमदार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. तो फक्त खोपोलीकरांमुळे. खोपोलीकरांनी मला दिलेली साथ मी आयुष्यभर कधी विसरणार नाही.

यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, शहरप्रमुख संदीप पाटील, मंगेश काळोखे, यशवंत साबळे, डॉ. शेखर जांभळे,मोहन अवसरमल,डॉ.सुनील पाटील,कुलदीप शेंडे, प्रमोद महाडिक, श्रीकांत पुरी, अरुण पुरी, हरीश काळे,राजू गायकवाड, संतोष मालकर, तात्या रिठे, इंदरमल खंडेलवाल, सचिन किर्वे, राहुल गायकवाड,प्रवीण गायकवाड, दिनेश जाधव, महिला आघाडीच्या सुप्रिया साळुंखें, प्रिया जाधव, माधवी रिठे, जीनी सॅम्युअल, शिल्पा मालकर, मेघा वाडकर, विनिता काळे, प्रमिला सुर्वे आदी प्रमुखांसह महायुतीचे आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.