रसायनी

रसायनी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव रसायनी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .तर दिनांक 16 एप्रिल रोजी आणि परिसरात महा मिरवणुकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आशिष जाधव यांनी केले होते.

या मिरवणुकीला निळ वादळ ग्रुप वावेघर. युवा आदर्श मंडळ नवीन पोसरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समिती सम्यक सामाजिक संस्था भारतीय बौद्ध महासभा बामसेफ व परिसरातील भीमसैनिक,सामाजिक संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

सेबी रोड येथून निवडणुकीची सुरुवात करण्यात आली .डीजेच्या तालावर थिरकत डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ,भगवान बुद्धांचा विजय असो, शिवाजी महाराज की जय,अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

डीजेच्या तालावर थिरकत नाचत निघालेले मिरवणुकीमध्ये महिलांसह आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता.नवीन पोसरी येते नील्या झेंड्याचे ध्वजारोहन आरपीआयचे शशी भालेराव यांच्याहस्ते करण्यात आले .मोहोपाडा मार्केट या ठिकाणी मिरवणूक वाजत गाजत जात असताना ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

या मिरवणुकीला मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पवार ,सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक पवार, माजी उपसरपंच राकेश खारकर ,आरपीआयचे शशी भालेराव, पंकज सोनावळे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड ,बिडी सोनावणे आर. के .कांबळे यांनी भेट देऊन मिरवणुकीत सहभाग घेतला .कार्यकर्त्यांकडून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर मिरणुक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नदानला भैरवनाथ ट्रस्ट चे मालक हनुमंत घाडगे व समाजसेवक यादव, सुवर्णा यांनी जेवणासाठी अन्नदान केले होते.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.