अष्टविनायक मधील महड हे वरदविनायक चे मंदिर खालापूर तालुक्यातील महड येथे असून आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने गणेश भक्तांनी वरदविनायक गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी प्रचंड उष्णतेचा त्रास भाविकांना जाणवत होता.गुरुवारी १४ एप्रिल पासून सलग चार दिवस सुट्टी असल्याने गुरुवार पासूनच गणेश भक्तांनी दर्शन घेण्यासाठी सुरुवात केल्याने आज नेहमी सारखी अंगारकीची गर्दी नव्हती,तरीही गर्दी होती.

सद्या उष्णतेची प्रचंड लाट उसळली आहे,त्यातच विद्यार्थी यांची परीक्षा सुरू झाली आहे.अनेक भक्त पहाटे ते सकाळ व सायंकाळी दर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत.
कोरोना चे नियम हटविल्या नंतर पहिलीच अंगारकी आहे,त्यामुळे अनेक भक्त परिवारासहित दर्शन घेताना दिसत होते.
यावेळी मन्दिर परिसरात सुंदर रांगोळी काढली होती.





















