खोपोली…
सहजसेवा फाउंडेशन व अगरवाल प्रिंटर्स,शिळफाटा यांच्या वतीने बुधवार दिनांक 05 ऑक्टोबर .2022 रोजी एकता रिक्षा चालक मालक संघटना, कार्यालय, शिळफाटा- खोपोली येथे खालापूर तालुक्यातील ऑटो रिक्षा चालकांच्या सन्मानार्थ रिक्षामध्ये स्टीकरच्या माध्यमातून जनजागृतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ए रिक्षावाला म्हणू नका,
ओ रिक्षावाले म्हणा असे संदेश देताना
श्रमिकांना सन्मान द्या या संदेशासोबत घरातून बाहेर पडताना घ्यावयाची दक्षता नमूद करण्यात आली.
सेना चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भाई शिंदे व एकता रिक्षा चालक मालक संघाचे अध्यक्ष एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर स्टिकरचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अगरवाल प्रिंटर्सचे संचालक तुषार अगरवाल, खोपोली पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक जगदीश ठमके,सहजसेवा फाउंडेशनचे सल्लागार अशोक ठकेकर,हानीफ दुदूके, मार्गदर्शक मोहन केदार,तालुका प्रमुख तैफिक कर्जिकर, विरांगणा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर, सामजिक कार्यकर्ते किर्ती ओसवाल, दिवेश राठोड,रिक्षा असोसिएशनचे किशोर सुतार, विकास साखरे, रामदास करकरे, सुनील खोपे, विक्रम कुलथे, रमेश तेलंगे, रमेश गायकर, बाबु साळुंखे, प्रदीप तळकर,जमील भाई, आरटीओ सल्लागार गणेश जांभळे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर. जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर,संघटिका निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, उपक्रम प्रमुख तुषार अगरवाल, दिपाली जोशी,सागरिका जांभळे यांनी अथक परिश्रम घेतले.
रिक्षा चालकांना दिलेला सन्मान हा नक्कीच समाजात चांगला संदेश देणारा आहे याचसोबत रिक्षा संदर्भात असणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करताना जनतेने सहकार्य करावे अशी सदिच्छा एकता रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पिंगळे यांनी व्यक्त केली..