खालापूर तालुक्यासह, जिल्हयात मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव सार्वजनिक मंडळ मार्फत तसेच घरगुती स्वरूपात साजरा होत असल्याने शांततेत गणपती उत्सव साजरा व्हावा ,या हेतूने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्व पोलीस ठाण्याशी संवाद साधला.

खालापुर तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नावर चर्चा झाली. याशिवाय सतत खंडित होणारा वीज पुरवठा व खंडित होण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे वैतागलेल्या नागरिकांना गणेशोत्सव काळात तरी दिलासा मिळावा अशी मागणी तालुक्यातून जवळपास सर्व सदस्यांनी केली. खालापूर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी या मुद्द्यावर देखील बैठकीत चर्चा झाली. महामार्गावरील खड्डे यामुळे गणेश भक्तांना प्रवासात विघ्न येऊ नये. यासाठी तातडीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी यावेळी झाली.त्याचप्रमाणे अंतर कमी करण्याच्या उद्देशाने चुकीच्या मार्गाने वाहनचालक गाड्या चालवतात, विशेषतः बापदेव ते वावंढळ या ठिकाणी गाड्या चुकीच्या मार्गाने प्रवास करताना दिसतात. सिमरन मोटर्स यांच्या मोठया ट्रेलरने वहातुक कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे,जुना मुंबई पुणे रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे गवत काढण्यात यावे,खालापूर येथे झालेल्या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, खोपोलीचे स.पो.नि हरीश काळसेकर,
जिल्हा शांतता कमिटी सदस्य आणि आतिक खोत, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,यासीन भालदार, रिचर्ड जॉन,मोहसिन शेख,सुरेश पाटील ,दत्ता जांभळे ,हेमलता चिंबूळकर, दिपक कांबळी, शशिकांत मुकादम,अर्जुन कदम उपस्थित होते.