शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील कारागृहात बंदिजनांसाठी अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची रायगड जिल्हा व कल्याण विभागाची जबाबदारी संपर्क प्रमुख माजी सरपंच संदिप मुंढे व प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव पत्रकार राकेश खराडे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे गृहविभागाने जाहिर केले असून संबंधित पत्र कारागृहप्रमुखांना पाठविले आहे. बंदिजणांसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय संगीत स्पर्धा तळोजा, कल्याण व अलिबाग कारागृहात जाऊन संपर्क प्रमुख माजी सरपंच संदिप मुंढे व जिल्हा सचिव राकेश खराडे यांनी तेथील कारागृह प्रमुखांसोबत चर्चा करून संगीत शिक्षकांकडून सराव सुरू केला आहे.बंदिजनांना सराव करत असताना संगीत साहित्याची कमतरता भासू नये.यासाठी प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव राकेश खराडे आणि संपर्क प्रमुख माजी सरपंच संदिप मुंढे यांनी अलिबाग कारागृहात जाऊन कारागृह अधीक्षक नागेश सावंत व तुरुंग अधिकारी श्री रनणवरे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व सौ कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ दिना व प्रकाश धारीवाल यांच्या सौजन्याने हातपेटी (हार्मोनियम),पखावाज,तबळा जोड,डगा,दहा टाळांच्या जोड्या, हातोडी,आणि विविध लेखकांची 82 पुस्तके असे साहित्य सुपुर्द करण्यात आले.याचप्रकारे कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक सदाफुले,तुरुंग अधिकारी श्री काळे यांनाही संगीत साहित्य सुपुर्द करण्यात आले.
दरम्यान स्पर्धेपुर्वं तयारीसाठी बंदिजणांना साहित्य मिळाल्याने अलिबाग कारागृह अधीक्षक नागेश सावंत, तुरुंग अधिकारी रनणवरे यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.