मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील पाच गावे दरडीच्या दहशतीखाली
शासनाकडे पत्रव्यवहार करुन सहा पॆक्षा अधिक काळ मात्र कारवाई शून्य.
मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील भयावह परिस्थिती
अलिबाग
रायगड जिल्हयासाहित महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरडी गावावर कोसळण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले असतानासुद्धा मांडला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदास वाडी, चाफेवाडी ,चाफेवाडी आदिवासीवाडी, महालुंगे खुर्द आणि महालुंगे खुर्द आदिवासीवाडी ही गावे दरडीच्या दहशतीखाली असून या गावचे भविष्यात तळई ,माळीण सारखी अवस्था होणार नाही का? या विवंचनेत येथील ग्रामस्थ आहेत.मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत फणसाड अभयारण्यलगत आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उत्तखनन होत असून याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून सहा महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन सुद्धा शासनाचे अधिकारी हे कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत केलेली नाही.शासन माळीण सारखी अवस्था होण्याची वाट बघत आहे का असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप रोहेकर सहित ग्रामस्थांनी केला आहे.
मांडला येथील डोंगर भागातील माती उत्तखनन बाबत कैफियत मांडताना रायगड जिल्हा मुरुड तालुका चर्मकार संघटना अध्यक्ष सुरेश नांदगावकर ,प्रभाकर रामचंद्र महाडिक, दत्तात्रेय चिंतू नागावकर ,दिलीप रोहेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंत रोहेकर,माजी पोलीस पाटील भारत नागोटकर ग्रामस्थ उपस्थित होते
दिलीप रोहेकर यांनी सांगितले की,मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत ही फणसाड अभयारण्याला लागून आहे.तसेच फणसाड धरण सुद्धा जवळ असताना मांडला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदास वाडी, चाफेवाडी ,चाफेवाडी आदिवासीवाडी, महालुंगे खुर्द आणि महालुंगे खुर्द आदिवासीवाडी या पाच गावातील जवळपास एकशे पन्नासच्या आसपास कुटुंबे राहत आहेत.
या गावामधील नागरिक सध्या भीतीच्या छायेत असून जीवाच्या भीतीने,या पाच गावातील नागरिक आपले जीवन जगत आहे.या ठिकाणी निसर्गाचे वरदान आहे. मात्र, या गावामधील डोंगराला गेल्या एक वर्षांपेक्षा अधिक काळ माती उत्तखनन हे मोठमोठ्या पोकलन,जेसीबी च्या साहाय्याने सुरू आहे.
गत वर्षी सारखी अतिवृष्टी झाली तर डोंगर गावावर येऊन कोसळेल, हळूहळू येथे भुसकलन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या ठिकाणील ग्रामस्थांनी आरोप केले आहे की, प्रशासन येत आणि आश्वासन देऊन जातं, वर्षभर ग्रामस्थांच्या जीवाचा थरकाप उडत आहे.
सदर जागा प्रामुख्याने तैझुन निसार हसोंन्जी या व्यक्तिच्या नावे असुन गट क्रमांक १८८/२(अ) क्षेत्र आहे ३६.९६:८०इतका असून लाखोंच्या पटीने ब्रासमातीचे उत्खनन होत असुन हजारो लाखो झाडे झुडपे बेचिराख झाले आहेत.मोठमोठ्या पोकलनीं,ब्रोगर,डंफर याने माती स्थलांतर व तेथेच भराव असा डोंगर ठिसूळ करुन टाकले असून येत्या पावसात आमचे गाव मांडलागावाचे मालीन व तळई होणार यात शंकाच नाही असे वक्तव्य तेथील दिलीप रोहेकर यांनी वस्तुस्थिती मांडली.
मांडला या गावालगत हजारो एकर डोंगर जमीन खरेदी करुन तेथे बेकायदेशीर मोठमोठ्या पोकलनी लावून जवळ जवळ वर्षभर अनधिकृतपणे खोदाई चालू असून डोंगराच्या खालच्या बाजूस मांडला गावाची वस्ती असून तेथेच गावकरी,मुळाबाळांसह पिकत्या शेतजमिनी संसार गुरे ढोरे,अशी मोठी नागरीक वस्ती असतांना समोरच खोदाई चालू आहे.
त्यासंदर्भात समंधीत ग्रामपंचायतीला दिनांक ०५/०८/२०२१रोजी पत्रव्यवहार करून विचारले असता कोणती परवानगी दिली की नाही तर याचे उत्तर आजवर मिळाले नाही.अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली.तर त्यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरहेड वर तहसील, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना दिनांक १८/०८/२०२१रोजी कळवीले आहे असे समजते.
परंतु त्याच्यावर अद्याप ठोस उपाययोजना झाली नसून पुन्हा ग्रामस्थांनी दिनांक १२/०४/२०२२ रोजी ग्रामपंचायतीला एक पत्र दिले आहे परंतु असे पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर याचा अर्थ असा की शासनाचे अधिकारी यांना माती उत्तखनन करणाऱ्यांबरोबर लागे संबंध असल्याने पाठिशी घालत आहे असा अर्थ होत.
अनेक पावसाळे बघितले मात्र, मागील ३ वर्षांपासून पावसाळा नको म्हणत आहे. कारण चिपळूण, माळीण या सारखी मोठी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांना पडला आहे.
तर दुसरीकडे आमदार, खासदार फक्त मते मागायला या गावचा उंबरठा झिजवतात, एकदा मतांचे राजकारण झाले की पुन्हा ते इकडे फिरकत ही नाही.असेही ग्रामस्थ यांनी सांगितले.मांडला येथील दिलीप रोहेकर यांनी सांगितले की, आमच्या जनजीवनाचे शासन स्तरावर दखल घेतली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ संवेदनशील मार्गाने या विरोधात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वड्डे
वड्डेटिवर,वनमंत्री,पालकमंत्रीअदिती ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,तसेच स्थानिक व माजी आमदार यांच्या नावाने पत्रव्यवहार करणार आहोत.तसेच याविरोधात आंदोलन देखील करणार असल्याचे सांगितले आहे.