रसायनी

रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात रमजाननिमित्त इफ्तार पार्टी साजरी झाली.या पार्टीत रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मांचे नागरीक सामील झाले होते.इफ्तार पार्टीच्या भव्य आयोजनातून रसायनीत सामाजिक सलोखा कायम असल्याचे प्रतिबिंब निर्माण झाल्याचे दिसून आले.

यावेळी उपवास करणा-यांनी खजूर,फळे व इतर फराळ आदी खाऊन रोजा पुर्ण केला.यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी मुस्लिम बांधवांनी पाहुणचार करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रसायनीतील परंपरा खंडित होणार नाही याची सर्व बांधवांनी दखल घ्यावी,नियमांचे पालन करावे,कोणतेही मेसेज खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नयेत,जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,शांतता अबाधित राखण्याचे काम हिंदू मुस्लिम बांधवांनी केले आहे,हि शांतता आणि बंधुभाव असाच पुढे कायम ठेवा असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, कॅमलीन कंपनीचे जनरल मॅनेजर दिपक कापसे,माजी सरपंच संदिप मुंढे,माजी सभापती रमेश पाटील, माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी उपसरपंच सुरेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवळे, सदस्य नंदकुमार पाटील, मोहोपाडा स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, सिकंदर शेख,जमील शेख, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य,पोलिस पदाधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

रसायनी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीचे मुस्लिम बांधवांनी कौतुक करुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.