राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमाताई मुंढे तसेच जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वज फडकविण्यात आला.याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, उपाध्यक्ष अशोक भोपतराव, गटनेते शरद लाड, तालुकाध्यक्षा रंजना धुळे, शहराध्यक्ष पुष्पाताई दगडे, सरचिटणीस पूजाताई सुर्वे, वर्षाताई पाटील, रेश्माताई चौधरी, रजनीताई गायकवाड, सुवर्णाताई निलधे, वंदनाताई थोरवे, संतोष पाटील, कैलास पोटे, संतोष थोरवे, बाळू ऐनकर, बाळू गायकवाड, अक्षय जाधव, निलेश घरत, केशव वांजळे, धीरज जाधव, सुदेश हजारे,जयंत पाटील, ऋषभ लाड, नंदू रुठे,महेश चंदन पाटील आदी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ नेते तानाजी चव्हाण यांनी पक्षाच्या स्थापने पासूनच्या वाटचालीविषयी माहिती सांगून भविष्यात संघटना मजबूत करण्याविषयी मार्गदर्शन केले.नामदार शरदचंद्र पवार यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्ष केंद्रांत आणि राज्यात तसेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत राहिला.पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चढती कमान कायम राहिली.