जन्म.१९८१
कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर तर होत्याच, पण त्या एक उत्तम अभिनेत्री देखील होत्या. दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून काम केल्यापासून कनू प्रिया यांनी अभिनय, पटकथा लेखन, चित्रपट निर्मिती आणि नाट्य सादरीकरणातही योगदान दिले होते. अवेकनिंग विद ब्रह्म कुमारी या दूरदर्शनवरील कार्यक्रमानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. कनू प्रिया यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की जेव्हा त्यांनी अवेकनिंग विद ब्रह्म कुमारी शो सोडला, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची संख्याही कमी झाली. कनू प्रिया यांनी अवेकनिंग विद ब्रह्म कुमारी हा कार्यक्रम सोडून त्या कर्मभूमी या कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या होत्या. कनुप्रिया यांचे ३० एप्रिल २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे.