जन्म. २८ एप्रिल १९४२ इंग्लंडमधील हॅरो येथे.
इंग्लिश क्रिकेटर माइक ब्रेअर्ली यांचे पूर्ण नाव जॉन मायकेल ब्रेअर्ली होय. अतिशय कुशल रणनिती आखण्यात वाकबगार असलेल्या माईक ब्रेअर्लीचे नाव आजही क्रिकेट विश्वात आजही आदराने घेतले जाते. प्रसिद्ध अशा केंब्रिज विद्यापिठाचा विद्यार्थी असलेला माईक ब्रेअर्ली क्रिकेटमध्ये पारंगत होतेच पण एक लेखक म्हणूनही नावलौकीक मिळविला होता. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली परंतु ” आर्ट ऑफ कॅप्टन्सी ” हे त्याचं पुस्तक विशेष गाजलं. जॉन मायकेल ब्रेअर्ली हा अतिशय हुशार कर्णधार स्वतः मात्र ३९ कसोटयाच खेळला. पण त्यातील ३१ कसोटयात त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यापैकी केवळ चार कसोटयात त्याला पराभव बघावा लागला, तर सतरा सामने जिंकले व दहा अनिर्णित राहीले. फलंदाज म्हणून माईक यांनी ३९ कसोटयात १४४२ धावा, २५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५१० धावा फटकाविल्या होत्या. माइक ब्रेअर्लीने १९८१मध्ये इंग्लंड संघाला ऍशेस सामना जिंकून दिली होती. माइक ब्रेअर्ली शेवटचा कसोटी सामना ते २७ ऑगस्ट १९८१ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले.जागतिक क्रिकेटचे नियम बनाविणाऱ्या एमसीसीचे या संस्थेचे अध्यक्षपद माईक ब्रेअर्ली यांनी भूषविले होते. माइक ब्रेअर्ली यांनी गुजराथ मधील माना साराभाई यांच्याशी लग्न केले आहे. माइक ब्रेअर्ली यांची माना साराभाई यांच्याशी पहिली भेट १९७६-७७ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर झाली. माना गुजरातचे मोठे व्यावसायिक गौतम साराभाई यांच्या कन्या होत. गौतम यांना असे वाटत होते की, त्यांच्या जावयाला गुजरातच्या संस्कृतीबद्दल माहीती असायला पाहिजे. यामुळेच माइक यांनी माना यांशी लग्न करण्यापूर्वी ४ वर्षांपर्यंत गुजराती भाषा शिकून घेतली. लग्नानंतर माना माइक यांच्या बरोबर लंडन येथे स्थायिक झाल्या.