३० मे बॉलीवूड अभिनेत्री किर्ती_कुल्हारी चा वाढदिवस.
जन्म. ३० मे १९८५
बोल्ड आणि ब्युटीफूल हा खास अंदाज असलेल्या किर्ती कुल्हारी हिने ‘खिचडी: द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. किर्ती कुल्हारीने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंगही केलं आहे. किर्ती कुल्हारीने जर्नालिझमही केलं आहे. किर्ती कुल्हारीने खिचडी, शैतान या सिनेमांमध्येही काम केलं आहे.‘शैतान’ चित्रपटानंतर तिला ‘पिंक’ चित्रपटाची ऑफर आली. ‘पिंक’ नंतर तिच्या करिअरला ‘यू टर्न’ मिळाला. मिशन मंगल, पिंक या सिनेमांमध्येही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. आत्तापर्यंत विविधांगी भूमिका साकारताना शिकण्याची धडपड, जिद्द, उमेद तिने टिकवून ठेवली. मधुर भंडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटात कीर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. इंदू सरकार या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. जल या सिनेमातही किर्ती कुल्हारीने केलेलं काम प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं
किर्ती कुल्हारीची ‘फोअर मोअर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन सध्या अॅमेझॉनवर गाजतो आहे.