ललित नाथुराम पुरोहित या तरुणाचा खोपोली विरेश्वर तलावात बुडून मृत्यू

0
1276

@सहज शिक्षण ऑनलाईन

शिळफाटा येथील रहिवाशी असलेला ललित नाथुराम पुरोहित वय ३२ या तरुणाचा आज सकाळी खपोली विरेश्वर तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ललित हा आपल्या मित्रांसमवेत या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता. यावेळी त्याला येथील पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो बुडाला असल्याचे येथील माहितगारांनी सांगितले. ललित बुडाल्याची बातमी समजताच येथील स्थानिक नागरिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. ललित हा विवाहित असून, त्याचा शिळफाटा येथे कपड्याच्या दुकानाचा व्यवसाय आहे. व्यापारी वर्गातील लोकप्रिय असा हा तरुण या ठिकाणी बुडाल्याने व्यापारी वर्गावरही शोककळा पसरली आहे.