कर्जत । शहरातील नागरी समस्या यांच्या बाबतीत कर्जत शहर बचाव समिती गेली सहा महिने सातत्याने आवाज उठवत आहे. या समितीच्या माध्यमातून कर्जत नगरपरिषदेकडे देण्यात आलेल्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद नगरपरिषद प्रशासन देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जत शहर बचाव समितीचे माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, रविवार (१५ डिसेंबर) पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून महिलांचा देखील या उपोषणात सहभाग आहे.
कर्जत शहरातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्या समस्यांवर पालिकेने लक्ष वेधून नागरी समस्यांना मार्ग काढावा यासाठी नागरिकांच्या अर्ज विनंत्या यांना पालिकाप्रशासन केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे अँड. कैलाश मोरे यांच्या संयोजनाखाली कर्जत शहर बचाव समितीचे माध्यमातून नगरपालिके विरोधात साखळी उपोषणाचा सनदशीर मार्ग हाती घेण्यात आला आहे.
अॅड. मोरे यांच्या नेतृत्वाखालीयापूर्वी महावितरण विरुद्ध मोठे आंदोलन उभे राहिले होते. आता कर्जत शहरातील नागरी सुविधा यांच्यासाठी हे आंदोलन उभे राहिले असून रविवारपासून कर्जत शहरातील नागरिक साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.