रसायनी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त नवीन वसाहत रिस येथे क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी नामफलक कोनशिलेचे उदघाटन आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते करण्यात आले.तर भवनातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींचे पुजन सचिन  कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी भवन बांधकाम समितीच्या वतीने आमदार मनोहर भोईर, महिला व बालकल्याण माजी सभापती उमा मुंढे, सरपंच  पुंडलिक पवार, उपसरपंच श्वेता कांबळे, जेष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड ,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी सभापती रमेश पाटील,माजी उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच शशिकांत मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मा.आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तर उपस्थित मान्यवरांनीही पुजन करुन अभिवादन केले.यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांनी बोलताना सांगितले की घराबाहेर पडल्यावर आपण समूहाचे घटक आहोत याची जाणीव बाळगून वागल्यास कोणताही धर्म एकमेकांना तारक -मारक ठरणार नाही.

एकमेकांच्या चांगल्या विचारातून आपण आपली प्रगती करु शकतो,हे समूह जीवनाचे तत्व आहे.रिस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणखी सुधारित करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असेही आमदार मनोहर भोईर म्हणाले.

याप्रसंगी क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम समितीचे अध्यक्ष सचिन गोपिनाथ कांबळे, उपाध्यक्ष गणेश कांबळे, कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, सचिव रुपेश कांबळे, सहसचिव जगदीश कांबळे, सदस्य विकास कांबळे,आशिष कांबळे, भिमराव कांबळे, सुमित कांबळे,सुरज कांबळे, सुशांत कांबळे, सतिश कांबळे,अंकूश कांबळे, प्रमोद कांबळे,अक्षय जाधव, सल्लागार शांताराम कांबळे,लक्ष्मण कांबळे,भिम कांबळे, रमेश कांबळे,अशोक कांबळे, लक्ष्मण कांबळे,पंकज गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.