१० मार्च संगीतकार साजिद वाजीद या जोडीतील संगीतकार वाजिद खान यांचा जन्मदिन.

0
60
जन्म.१० मार्च १९८१
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध तबला वादक उस्ताद शराफत अली खान यांची दोन मुले म्हणजे साजिद खान व वाजिद खान. सलमान खान-काजोल यांच्या सोहेल खान दिग्दर्शित ‘प्यार किया तो डरना क्या’ (१९९८) मधील ‘तेरी जवानी बडी मस्त मस्त है’ या गाण्याने या जोडीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या जोडीने संगीतबद्ध केलेल्या गायक सोनू निगम यांच्या ‘दीवाना’ (१९९९) या अल्बममधील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सलमान खानच्या चित्रपटाचे संगीतकार अशी त्यांची ओळख झाली. या जोडीच्या काही गाजलेल्या चित्रपटात हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड, दबंग, रौडी राठोड, हाऊसफुल्ल-२, चष्मे बद्दूर यांचा समावेश आहे. वाजिद हे स्वतः गायकही होते. डू यु वॉन्ट अ पार्टनर, तुझे अकसा बीच घुमा दु, तेराही जलवा, हूड दबंद दबंग, पांडे जी सिटी, माशा अल्लाह इत्यादी गाणी त्यांनीच गायलीत. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी सलमान खानसाठी ‘प्यार करोना ‘ आणि ‘भाई भाई ‘ ही गाणी संगीतबध्द केली होती. वाजिद खान यांचे निधन ३१ मे २०२० रोजी निधन झाले.