सहज निसर्ग शाळेत सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रय मिनचंद यांनी केला वाढदिवस साजरा 

0
203

सहज निसर्ग शाळेत सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रय मिनचंद यांनी केला वाढदिवस साजरा 

आता सहज निसर्ग शाळेत अ आ इ सोबत A B C D ची सुरुवात 

सातत्यपूर्ण सहज शिक्षण शाळेचा दहावा रविवार

रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड येथून सुरुवात झालेली वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या शाळेत दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रय मिनचंद यांनी सहज निसर्ग शाळेत आपला वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा स्वीकारून मिनचंद दांपत्यानी मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा देताना मार्गदर्शन केले.


श्री.राजेंद्र भुरमल ओसवाल यांच्या माध्यमातून कोलगेटचे वाटप व के.बी.पाटील तसेच ज्योती भुजबळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.श्री.दत्तात्रय मिनचंद यांच्याकडून शालेय साहित्यासाठी मदत..
सहजसेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.इशिका शेलार,कार्यवाह बी.निरंजन,संघटक अखिलेश पाटील, नकुल देशमुख व जयश्री भागेकर यांचे शिक्षकरूपात सातत्यपूर्ण अमूल्य योगदान.
आजच्या सहज निसर्ग शाळेत नेरे हायस्कूल नेरे भागशाळा विहिघर व ज्युनिअर कॉलेज,नेरेचे माजी मुख्याध्यापक श्री. कमलाकर पाटील,दत्ताजी मिनचंद,सौ.तनुजा मिनचंद,निहारीका जांभळे,वैष्णवी भोईर,श्रुती भोईर व सार्थक भोईर यांची उपस्थिती..

तसेच सातत्यपूर्ण चालणाऱ्या या सहज निसर्ग शाळेत मनःपूर्वक योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार…