२८ जानेवारी प्रसिद्ध भारतीय सूफी आणि कव्वाली गायक जान मोहम्मद जानी बाबू उर्फ जानी बाबू कव्वाल तथा जानी बाबू यांचा स्मृतिदिन.

0
230
जन्म. १९३५ मध्ये नागपूरजवळील हिंगण घाट येथे.
जानी बाबू म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या सय्यद जान मुहम्मद यांनी वयाच्या दहाव्या वर्षी शालेय कव्वाली स्पर्धेत भाग घेतल्यानंतर गायनाची सुरुवात केली. १९५५ च्या सुमारास त्यांचा ‘दमादम मस्त कलंदर’ ही कव्वाली लोकांमध्ये हिट झाल्यानंतर त्यांना ओळख मिळू लागली. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी देखील गाणी गायली. रोटी कपडा और मकान मधला त्यांचे “मेहंगाई मार गई” आजही लोकांच्या तोंडावर आहे. HMV, T-Series आणि Venus द्वारे त्यांच्या असंख्य रेकॉर्ड तयार केल्या गेल्या. जानी बाबू यांचे २८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.
त्यांच्या गाजलेल्या गझल्स. ‘मुहम्मद के गुलामून पर बुधापा आ नहीं सकता’, ‘जन्नती जहाज’,’धोका हुई गवा’,’वो एक भोली सी लड़की है’, आणि ‘असर-ए-कयामत हैं’.