समाजातील उपेक्षित घटकांसाठी सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे-कपिल मोदी.

0
75

वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या सहज निसर्ग शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा…

विटभट्टीवरील मुलांच्या शाळेतील या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून होणार नोंद.

टाटा स्टील वोलेंटर व शीळफाटा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद महाडिक यांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप….

खालापूर

महड फाटा येथे सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सहज निसर्ग शाळेत दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी टाटा स्टील लिमिटेडचे होसुर व खोपोलीचे आस्थापन प्रमुख कपील मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी सहज निसर्ग शाळेत दर रविवारी शिक्षक रुपाने योगदान देणाऱ्या उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन,संघटक अखिलेश पाटील,नकुल देशमुख,जयश्री भागेकर व विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा पुरविणारे वावोशी येथील डॉ.प्रदीप पाटील यांचा खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी पंचायत समिती,खालापूर तर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.याचवेळी दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी दरीत पडलेल्या हैद्राबाद येथील मृत इसमास दरीतून बाहेर काढताना दाखविलेल्या तत्परतेबद्दल बंटी कांबळे,आफताब सय्यद व खिदमते खल्क सामाजिक संस्थेचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी या उपक्रमात मदत करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजातील उपेक्षित घटकांसाठी सर्वांनी कार्य केले पाहिजे व समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन टाटा स्टील लिमिटेडचे होसुर व खोपोलीचे आस्थापन प्रमुख कपील मोदी यांनी केले.
गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी शिक्षणापासून दुर्लक्षित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सुनील पाटील,वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे प्रमुख उल्हासराव देशमुख,प्रशासकीय अधिकारी तेजस्वी देशमुख,पंचायत समिती खालापूरचे गट शिक्षण अधिकारी आशा खेडकर,प्रशासन अधिकारी संजीव चोपडे,कनिष्ट प्रशासन अधिकारी गणेश भांडारकर,आरोग्य निरीक्षक सुधीर जोशी, कनिष्ठ लिपिक वळकुंडे,आरोग्य सेविका संगीता चव्हाण,पंचायत समितीच्या शिक्षिका, टाटा स्टीलचे सी.एस.आर.प्रमुख भावेश रावळ,सेक्युरीटी प्रमुख मनजीत सिंग,खालापूर तालुका वीटभट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अझीम कर्जीकर,आसिफ जळगावकर,शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले,खोपोली शहर राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील,रमेश कुंडले,जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नारायणराव खेडकर, सह्यादी विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक जगन्नाथ रणदिवे,आकाश फक्के,योगेश चौधरी,राजू केदारी,खोपोली पोलीस स्टेशनचे सचिन घरत,राहुल कुलकर्णी,दिवेश राठोड,खिदमते खल्क सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आयुब खान,आयान सय्यद,खलील शेख,आबुजर शेख,नईम खान,अहमद खान,
तसेच सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,सचिव वर्षा मोरे, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख तौफिक कर्जीकर,मोहन केदार,प्रतिभा दसारे,नयन मोरे,आसिफ खान,नरेंद्र मेघावल,गणपत भोसले,निलम पाटील,सागरिका जांभळे,राहुल दसरे, प्रथमेश पाटील तसेच खालापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे,अर्जुन कदम,अनिल पाटील,विकी भालेराव,दिनेश पाटील,संदीप ओव्हाळ,प्रसाद अटक व याचसोबत ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फक्के यांनी केले.