बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठानचे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

0
64

संस्थेचे सहावे रक्तदान शिबिर संपन्न…

खोपोली…

बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान ही वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम करत असते.विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घेऊन ही संस्था गरजूंना मदतीचा हात देत असते. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारे सर्व सहकारी ही या संस्थेची विशेष ओळख आहे. याच सामाजिक वस्यातून देशभर कोरोनामुळे रक्ताचा कमी पुरवठा होत आहे,याच पार्श्वभूमीवर बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान,मुळगाव खोपोली यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. समर्थ मंगल कार्यालय,खोपोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते एकशे एक रक्तदात्यांनी यामध्ये भाग घेतला.संस्थेचे हे सहावे रक्तदान शिबिर आहे. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सन्माननीय सहकारी माजी नगरसेवक दिलीप जाधव,अध्यक्ष जनार्दन जाधव, उपाध्यक्ष सुनिल पौरकर,खजिनदार सचिन आगिवले, सचिव नरेश शेंडे, सहखजिनदार स्वप्नील शेंडे, परीट गोरमे,सोयब गोरमे,सचिन बनकर केतन शेंडे,शशिकांत शेंड,सुधिर पिंगळे, सुनील पिंगळे,विवेक पिंगळे व इतर सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या शिबिरात खालापूर तालुक्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.समर्पण ब्लड बँकेच्या मदतीने हे रक्तदान शिबिर पार पडले.