सहजसेवा फाउंडेशनच्या इशिका शेलार खालापूर तहसीलकडून व पंचायत समितीकडून सन्मानित…

0
161
खालापूर…

कोरोना काळात कोरोना मृतदेहावर अंतीम संस्कारात भाग घेणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला तसेच खालापूर तालुक्यात वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू असणाऱ्या शाळेत दर रविवारी शिक्षिका म्हणून जबाबदारी घेऊन साधारण 100 विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सक्षम शिक्षिका तसेच सहजसेवेच्या सर्व उपक्रमात जबाबदारी स्वीकारून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या “सहजसेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा इशिका शेलार” यांचा तहसीलदार कार्यालय, खालापूरच्या वतीने तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते व नायब तहसीलदार कल्याणी कदम, गटविकास अधिकारी बालाजी पुरी,खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते तसेच प्रशासकीय अधिकारी,विविध संस्था व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच पंचायत समिती खालापूरच्या वतीनेही वीट भट्टी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन खालापूर तालुका गटविकास अधिकारी बालाजी पुरी व टाटा स्टील कंपनीचे खोपोली व होसुर विभागाचे कंपनी प्रमुख कपिल मोदी तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.