मुंबईला हुडहुडी ; हवाही ‘धोकादायक’ श्रेणीत

0
39

मुंबई :

सौराष्ट्राहून आलेले धूलिकणयुक्त वारे आणि त्याचवेळी तापमानात घट होऊन वाऱ्यांचा वेग मंदावल्याने सोमवारी मुंबई आणि परिसरात हवेचा दर्जा ‘धोकादायक’ श्रेणीत नोंदला गेला़

कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हुडहुडीही कायम राहिली़

सोमवारी कुलाबा येथे २४.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.