रसायनी रस्ता बनला मृत्यु चा सापळा !

0
19

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! अपघाताच प्रमाण वाढलं

रसायनी:-

आपटा फाटा ते रसायनी हा रस्ता मुंबई – गोवा महामार्गाला जोडणारा अंतर्गत रस्ता आहे. गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करून सुद्धा रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही .

मोठं – मोठे खड्डे असल्या कारणाने दुचाकी वाहनांचे अपघात होत असतात . “मागील 15 दिवसांत 4 अपघात घडले” .त्यामधील आपटा गावातील ग्रामस्थ विलास कदम यांच्या हाताला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाला.

 

मुख्य रस्त्यावर फरशी आहेत ,आपटा फाटा एच.ओ.सी कंपनी चौकच्या पुढे वळणदार रस्ता आहे . तिथे फरशी खालील भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे ,नवीन प्रवाशांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्युच द्वारच आहे.

 

त्याचप्रमाणें आपटा गावातील रेल्वे ब्रिजजवळ अशाच प्रकारची समस्या पाहायला मिळते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने झाडे – झुडुपांच प्रमाण जास्त आहे . ही झाडे रस्त्यावर पडत असतात. त्याची कापनी होत नसल्याने अपघातास आमंत्रण दिले जाते.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना विचारले असता , उडवा- उडवीची उत्तरे मिळतात असे नागरिक सांगत आहेत.

 

आजतागायत हीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याने सदर परिसरातील नोकरवर्ग , वाहनचालक , ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

 

भविष्यात जर ह्या खड्ड्या मुळे अपघातात मृत्यु झालं तर सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भुवड यांनी उपस्थित केला आहे.