बोरिवलीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भुमिपुजन

0
17

वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावात सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे सुरू असून बोरीवली आदीवासीवाडीतील गावातील अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.

 

तसेच बोरीवली गावातील वसंत भोईंर ते संतोष भोईर ते अजित भोईर यांच्या घरापर्यंत काॅक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन व बोरीवली गावातील दिपक पाटील यांच्या घरापासून अनंता पाटील यांच्या चाळीपर्यंत नवीन गटार बांधकामाचे भूमिपूजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.

 

यावेळी ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, सदस्या निता संदिप पाटील, सरिता संतोष गडगे,वर्षां संतोष पाटील,शिवाजी तुकाराम शिंदे, नंदकुमार दत्तात्रेय पाटील, राजेश हरिश्चंद्र पाटील, संदिप शंकर पाटील, संदिप बाळू शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामाचे उद्घाटन व भुमिपुजन करण्यात आले.