वेध सह्याद्रीतर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

0
17

रक्तदान शिबिरात ५० हुन अधिक रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

खोपोली : स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती १२ जानेवारी रोजी वेध सह्याद्री मार्फत खोपोली सह संपूर्ण खालापूर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.खोपोली येथील प्रथम सत्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिळफाटा येथे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फक्के व वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

दुसऱ्या सत्रात वेध सह्याद्री मार्फत समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ५० हुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते पार पडले शिबिरात महिलांची विशेष उपस्थिती पहायला मिळाली.

 

या सर्व कार्यक्रमास खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर, शिवसेना खोपोली शहर प्रमुख तथा मा.नगरसेवक सुनील पाटील, मा.नगरसेवक मोहन औसरमल,मनीष यादव, मनसेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे,भाजपाचे हेमंत नांदे, अजय इंगुलकर, युवक राष्ट्रवादीचे अतुल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिती दाखवत उपक्रमाचे कौतुक केले.

 

मोहिमेचे मोहीम प्रमुख म्हणून करण साळवी व वेध सह्याद्रीच्या सर्व सदस्यांनी उत्तम रित्या नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला.