राज्यात आणखी ११ ‘ओमायक्रॉन’ बाधितांची नोंद ; ८२५ नवीन करोनाबाधितही आढळले

0
41

 

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील आता ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ११ नवीन ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले. यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे.

 

आज आढललेल्या ११ ‘ओमायक्रॉन’बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळून आलेल्या ६५ ‘ओमायक्रॉन’बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.