खालापूर तालुक्यात सहज निसर्ग शाळेचा शुभारंभ.

0
130

वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सहजसेवा फाउंडेशनचे साक्षरता वर्गाचे धडे..

खालापूर…

खालापूर तालुक्यात विविध वीटभट्टी व कंपन्या आहेत.यातील बऱ्याचशा कामगारांची व मजुरांची मुले कायम अशिक्षित राहतात. पर्यायाने ही मुले कायम निरक्षर राहतात.

समाजातील हा उपेक्षित घटक साक्षर व्हावा या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनने महड फाटा येथील वीटभट्टी येथे रविवार दिनांक 19 डिसेंबर पासून झाडाच्या सावलीखालील शाळेचा शुभारंभ केला आहे.दर रविवारी भरणाऱ्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्याचे धडे दिले जातील. याच सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबविले जातील शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना ओळखपत्र पुरविण्यात आले.


मुलांना साक्षर बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी प्रबोधन केले जाईल तसेच वीटभट्टी काम करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य व स्वच्छतेचे धडे देण्यात येतील.
या उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र फक्के, राजेश पाटील,मोहन केदार,नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी ध्यास प्रतिष्ठान,पुणेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील,चैताली ढमाले,राहुल डेरेकर,अमोल चव्हाण तसेच अझीम कर्जिकर,आसिफ जळगावकर,आतिक मांडलेकर, आश्रफ जळगावकर,मौजम मांडलेकर उपस्थित होते.


देशाचे भवितव्य असणारे हात शिकवून साक्षर करूया व उपेक्षित घटकांना या होणाऱ्या सामाजिक मदत कार्यात टाटा स्टील,निलम पाटील,संतोष गायकर,आनंद शाळा खोपोली,शिशु मंदिर खोपोली,प्रदीप खंडेलवाल,ज्योती भुजबळ,खोपोली परळी जांभुळ पाडा लोहाना महाजन समाज,रोहित टिम्बर,राकेश ओसवाल,ठाकरे मेडिकल्स खोपोली,अगरवाल प्रिंटर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.या मुलांना साक्षर करण्यासाठी नकुल देशमुख,इशिका शेलार व कांचन सावंत यांनी शिक्षकरूपात जबाबदारी स्वीकारली आहे.

या उपक्रमात स्व.अनंता काशिनाथ मोरे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक नितीन मोरे यांनी ओम्नी गाडी भेट दिली.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,उपाध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे,कार्यवाह बी. निरंजन, आफताब सय्यद,बंटी कांबळे,अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

महड येथील शुभारंभ झालेल्या या उपक्रमातुन मुले साक्षर होण्याने समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, तसेच लवकरच तालुक्यातील विविध ठिकाणी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजन करण्यात येईल,आपल्या विभागात अश्या प्रकारच्या गरजू घटकांसाठी निसर्ग शाळा सुरू करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन खालापूर तालुका वीट भट्टी संघटनेचे अध्यक्ष अझीम कर्जिकर यांनी केले आहे.