१ डिसेंबर अभिनेत्री मयुरी_वाघ चा वाढदिवस.

0
88
जन्म. १ डिसेंबर
अभिनयाबरोबरच भरतनाटय़म विशारद असलेली मयुरी वाघ मूळची डोंबिवली आहे.
मयुरीने बाल कलाकार म्हणून ‘उठी उठी गोपाळा’ हे नाटक केले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘मांगल्याचे लेणे’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. ‘वचन दिले मी तुला’ या मालिकेद्वारे मयुरीने आपला मोर्चा छोटय़ा पडद्याकडे वळविला. मयुरीने ‘वचन दिले तू मला’, ‘ही वाट दूर जाते’, ‘मेजवानी’, ‘सुगरण’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. झी मराठी वरच्या ‘अस्मिता’ या मालिकेने मयुरी वाघला ओळख मिळवून दिली. तिने या मालिकेत एका गुप्तहेराची साकारलेली भूमिका अबालवृद्धांना पसंत पडली होती. मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत अभिजीतची भूमिका करणाऱ्या पियुष रानडे बरोबर २०१७ मध्ये विवाहबद्ध झाली.
पियुष रानडेचा हा दुसरा विवाह आहे. शाल्मली तोळ्ये बरोबर पियुष रानडेचे पहिले लग्न झाले होते. शाल्मली तोळ्ये हे लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. २०१० मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली पण लग्नाच्या चार वर्षांनंतर २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.