सुरेखा खेडेकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही …

0
63

खोपोली..

खोपोली नगर परिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे अनेक जण यासाठी इच्छुक व अनेक जण जनतेच्या मागणीप्रमाणे रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. “यातच खोपोलीमध्ये समाजकारण व राजकारण यामध्ये सुरेखा खेडेकर यांनी जनतेचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा तमाम समर्थकांनी व्यक्त केली आहे.” सुरेखा खेडेकर यांचा जनसंपर्क व सर्वांना मदत करण्यासाठी नेहमी असणारी तत्परता हे त्यांच्या आजवरच्या कामाचे मूल्यमापन आहे.

अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नेतृत्व करत असेल तर नक्कीच विकास होईल असा विश्वास असल्याने यावेळी तमाम कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे.शिवसेनेची धडाडीच्या नेत्या असणाऱ्या सुरेखा खेडेकर यांचा अनेक आंदोलने व समाजकार्यात हिरीरीने भाग असतो.

“सहज समाचारच्या माध्यमातून सुरेखा खेडेकर यांनी यावेळी जनाग्रहातसव ही निवडणूक लढवून मिळालेल्या संधीचे सोने करणार असा आशावाद व्यक्त करताना वार्डात प्रलंबित कामांना चालना देऊन जनतेच्या मनातला नगरसेवक होणार हे ही निक्षून सांगितले आहे.”